इम्रान खान यांचा निर्णय पाकिस्तानी लष्करानेच उलटवला


एएमसी मिरर : वेब न्यूज
कर्तारपूर कॉरिडॉरवरून पाकिस्तानी लश्कराकडून पंतप्रधान इम्रान खान यांचा निर्णय उलटवण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांच्या मते आता भारतातील शीखांना कर्तारपूर कॉरिडोरचा वापर करण्यासाठी भारतीय पासपोर्टची आवश्यकता असणार आहे. विशेष म्हणजे या अगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटद्वारे घोषणा केली होती की, कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता लागणार नाही.
पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटद्वारे म्हटले होते की, भारतातून कर्तारपूरला येणाऱ्या शीखांना दोन गोष्टींमध्ये सवलत देण्यात येणार आहे. पहिली त्यांना पासपोर्टची आवश्यकता भासणार नाही, केवळ वैध असणारे एक ओळखपत्र असावे आणि दुसरी म्हणजे त्यांना दहा दिवस अगोदर नोंदणी करण्याची कोणतीही गरज असणार नाही. तसेच, उद्घाटनाच्या दिवशी आणि गुरूनानक देव यांच्या 550 व्या जयंती दिनी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.


Post a Comment

Previous Post Next Post