देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : बच्चू कडू


एएमसी मिरर : वेब न्यूज
देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील, तर मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा टोला प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्या काही जण शरद पवारही शिवसैनिक आहेत असं म्हणतील, असेही ते म्हणाले.
भाजपाकडून जर नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तर मग मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात काहीच हरकत नसावी. शिवसेना आणि भाजपामध्ये ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. शिवसेनेकडे यासंबंधी पुरावेदेखील आहेत. जर भाजपने वचन दिले असेल, तर त्यात मुख्यमंत्रीपदही येते. भाजपाला एवढं ताणून ठेवण्याची गरज नव्हती. भाजप जर बोलल्याप्रमाणे करत नसेल, तर ते फसवणूक करत आहेत, असा निशानाही बच्चू कडू यांनी साधला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण मातोश्रीवर आलो आहोत. शेतकऱ्यांना मदत जाहीर होणं सध्या महत्त्वाचं आहे. युतीचा पेच सुटू शकतो इतका आमचा आकडा मोठा नाही. राजकारणात फोडाफोड होत असते. पण शिवसेनेला काही घाबरण्याची गरज नाही. भाजपाने मोठा भाऊ समजून शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.










Post a Comment

Previous Post Next Post