राष्ट्रपती राजवट हा महाराष्ट्राचा घोर अपमान : राज ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १८ दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यावर ओढवलेल्या या स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी राज्यातील या स्थितीबाबत भाष्य करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे.

Post a Comment

Previous Post Next Post