एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना माझ्याकडून शुभेच्छा. महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी ते मेहनतीने काम करतील हा मला विश्वास आहे” असे मोदी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
काल रात्री सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीकडून पंतप्रधान मोदींनी शपथविधी सोहळयाचे निमंत्रण देण्यात आले होते. शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळयाला भाजपाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्याशिवाय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पत्नीसह शपथविधी सोहळयाला उपस्थित होते.
Post a Comment