प्रवरा पतसंस्थेत ‘पटवर्धन’च्या ठेवीदारांचे आंदोलन


एएमसी मिरर : नगर
ठेवीदार कल्याणकारी संस्थेच्यावतीने भिस्तबाग रोडवरील प्रवरा नागरी पतसंस्थेत पूर्वीच्या रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या ठेवीदारांनी धरणे आंदोलन केले. दोन महिन्यांत ठेवी अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
रामदास क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कुंकूलोळ यांना निवेदन देण्यात आले. ठेवीदारांच्या ठेवलेल्या ठेवी परत मिळेपर्यंत अथवा लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आपल्या स्तरावर सर्व संचालक तसेच जिल्हा उपनिबंधकांना बोलावून ठेवीदारांसमोर चर्चा व्हावी व न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी एम. आर. पठाण, रमेश घोडके, इरफान तांबोळी, विक्रम क्षीरसागर, रघुनाथ रायते, रामदास पुंडे, स्वप्नील देवचक्के, ताराबाई गुंड आदींसह ठेवीदार उपस्थित होते. दरम्यान, 3640 ठेवीदारांच्या 48.05 कोटींच्या ठेवी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post