शपथविधीपूर्वी राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना पाठवलं पत्र


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“शपथविधीसाठी उपस्थित राहता येणार नाही याबद्दल त्यांनी खंत सुद्धा व्यक्त केली. सरकार स्थापनेआधी महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडल्या त्या लोकशाहीसाठी धोकादायक पायंडा पाडणाऱ्या आहेत” असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.
“लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचा भाजपाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आल्याचा मला आनंद आहे”. “महाराष्ट्रातील जनतेला महाआघाडीकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आपण राज्यातील जनतेला स्थिर, धर्मनिरपेक्ष आणि गरीबांसाठी काम करणारे सरकार देऊ” असा मला विश्वास आहे असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post