आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज
आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. पण हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या निकालावर दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले, अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं त्याचं आज सार्थक झालं. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार! यासोबतच लवकरात लवकर राममंदिराची उभारणी व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
Post a Comment

Previous Post Next Post