नराधम पित्याचा पोटच्या मुलीवर अत्याचार


एएमसी मिरर : नगर
नराधम पित्याने पोटच्या अल्पवयीन 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन पित्याविरुद्ध नगर जिल्ह्यातील सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नराधम पित्याने नऊ नोव्हेंबर रोजी रात्री स्वतःच्या अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही बाब पीडित मुलीने चाईल्ड लाईनच्या कानावर घातली. चाईल्ड लाईनचे पथक सुपा परिसरात गेले. पीडित मुलीला आधार देऊन तिला घेऊन सुपा पोलिस ठाण्यात गेले. सोमवारी रात्री पावणेबारा वाजता सुपा पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post