मुख्यमंत्री 'संघ'दरबारी; तिढा सोडवण्यासाठी मोहन भागवतांचा पुढाकार?


एएमसी मिरर : वेब न्यूज
मागील 14 दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तेची कोंडी फुटलेली नाही. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपमधील वाद मिटण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याप्रकरणी मार्ग काढेल, असे चित्र पाहायला मिळत आहे. काल नागपुरातील संघाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात तब्बल सव्वा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी संघ महत्त्वाची भूमिका घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काल सरसंघचालकांची भेट घेऊन मुख्यमंत्री रात्री पुन्हा मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे संघाच्या प्रयत्नानंतर आज भाजपची शिवसेनेशी नव्याने चर्चा होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेशी सर्व प्रकारच्या चर्चेसाठी भारतीय जनता पक्ष तयार असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. काल झालेल्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मोहन भागवत यांच्यासमोर सर्व अडचणी मांडल्या. त्यानंतर भागवत यांनी याप्रकरणी संघ मध्यस्थी करेल असे, सांगितल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post