5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल : संजय राऊत


एएमसी मिरर : वेब न्यूज
'येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल' असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान आज संसद भवनात होणाऱ्या शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारलं असता पवार-मोदी भेट नेहमी खिचडीच नसते, पवार साहेबांना शेतीबाबत अधिक माहिती आहे. पंतप्रधान देशाचे आहेत. जर एखादी समस्या असेल तर कोणीही त्यांची भेट घेऊ शकतं, असंही संजय राऊत म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असून सत्तापेच कायम आहे. अशातच संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत केलेलं हे विधान मोठं आहे. तसेच पवार आणि मोदी यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्षं असून त्यासंदर्भात अनेक चर्चाही सुरु आहेत.महाराष्ट्रात एक मजबूत सरकार डिसेंबरपूर्वी स्थापन होईल, सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु असून महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे काही कायदेशीर बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. परंतु जेव्हा राज्यपालांकडे आम्ही बहुमताचा आकडा सिद्ध करू त्यावेळी ते आम्हाला सराकर स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील . ही एक प्रक्रिया आहे. याआधीही देशात असं झालेलं आहे. जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी याच प्रक्रियेतून सर्वांना जावं लागतं. येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल, उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post