एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहणार


एएमसी मिरर : वेब न्यूज
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या (रविवार) एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली.
सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या घटकपक्षांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, नुकतीच आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सर्वकाही ठिकठाक आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वच नेते उद्या मुंबईत हजर राहणार आहेत.Post a Comment

Previous Post Next Post