'एवढे दयावान राज्यपाल आम्हाला लाभलेच नव्हते'


एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्राचं सरकार चालवणं हा काही पोरखेळ नाही. संख्याबळ आणि पाठिंब्याची पत्रं आमच्याकडे नव्हती. त्यामुळेच आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र, राज्यपालांनी आम्हाला मुदत दिली नाही. राष्ट्रपती राजवट लागल्याने आम्हाला सहा महिन्यांचा कालवाधी दिला आहे. एवढे दयावान राज्यपाल आम्हाला लाभलेच नव्हते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
वेगळ्या विचारधारेचे प्रश्न एकत्र कसे येणार हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे. मात्र, भाजपा आणि मुफ्ती मोहम्मद कसे एकत्र आले? पासवान आणि भाजपा कसे एकत्र कसे आले? चंद्राबाबू आणि भाजपा एकत्र कसे आले होते? याची माहिती मी मागवली असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत युती तुटली का? हा प्रश्नही विचारण्यात आला. या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी मात्र बगल दिली आहे. भाजपा अजूनही संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, रोज नवनवे प्रस्ताव येत असतील, तर त्या चर्चेला काही अर्थ नाही. जे काही ठरलं होतं ते ठरलं होतं. मला खोटं ठरवण्यात आलं त्यामुळे माझा संताप झाला, असे ते म्हणाले.
भाजपाने परवा आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मित्राचा सल्ला आम्ही ऐकला आहे, असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. जे काही ठरेल ते जगजाहीर होणार आहे आम्ही लपूनछपून काहीही करणार नाही.भाजपाने आमच्यासोबत ठरवलेल्या गोष्टी होत्या त्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरवलंच होतं. मात्र भाजपाने मला खोटं ठरवलं आणि ते माझ्यासाठी संतापजनक होतं. हिंदुत्त्व ही आमची विचारधारा आहे. हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे. देशात रामराज्य आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण रामराज्य आणावं ही आमची संकल्पना आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post