'तर तुमचं काय करायचं ते आम्हाला सांगायची गरज नाही'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही आम्ही आलो आहोत. आमचा अडसर मोकळा करा. वाटेतून बाजूला झाला नाहीत तर तुमचं काय करायचं ते आम्हाला सांगायची गरज नाही. जो काही फोडाफोडीचा केविलवाणा प्रयत्न केला, तो आणखी करा म्हणजे आम्ही आणखी एकजूट होऊ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाना साधला आहे.
महाविकास आघाडीचे १६२ आमदार मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील याठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील या ठिकाणी भाजपवर टीका केली.
सत्यमेव जयते असलं पाहीजे सत्तामेव जयते आपण होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. आम्ही केवळ ५ वर्षांसाठी आलो नाहीत तर ५ चा पाढा म्हणण्यास आलो आहोत, असा विश्वास त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी व्यक्त केला. हे दृश्य बघून आता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post