शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे. संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे.
आज दुपारच्या सुमारासच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं. मात्र संजय राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळले. दुपारनंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post