संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवेसना नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या सहा जनपथ येथील निवासस्थानी संजय राऊत पोहोचले आहेत.
विशेष म्हणजे आजच शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे संजय राऊत भेटीला पोहोचल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तापेचावर चर्चा होऊन काही तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.


Post a Comment

Previous Post Next Post