संजय राऊत म्हणतात, ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’..


शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने सोमवारी शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली. या तिन्ही पक्षांनी १६२ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांना सादर केले. त्यानंतर आमदारांना सायंकाळी ग्रँड हयात या हॉटेलात एकजुटीची शपथ देण्यात आली.
त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये, “१६२ आणि अधिक…वेट अ‍ॅण्ड वॉच” असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विट मुळे नवी चर्चा सुरु झाली आहे. '१६२ आणि अधिक'चा अर्थ वेगवेगळ्या माध्यमातून लावला जात आहे. भाजपचे काही आमदार शिवसेनेच्या गळाला तर लागले नाही ना? अशी चर्चाही आता सुरु झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post