जय हिंद : लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात शिवसेना - भाजपमधील तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रमक भुमिका मांडत आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच राऊत यांनी प्रवास करण्यावरुन ट्विट करत भाजपला एक टोला लगावला आहे.
संजय राऊत आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्र चालताना फोटो ट्वीट करत या फोटोला त्यांनी “जय हिंद” असे कॅप्शन दिले आहे. ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है’ असे वाक्य त्यावर लिहिलेले आहे.सोशल मीडियात या ट्विटने धुमाकूळ घातला आहे.

रविवारीही राऊत यांनी शायर वसीम बरेलवी यांचा शेर ट्विट करत भाजपाला टोला लगावला होता. ‘उसूलों पर जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है जो ज़िन्दा हो, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है’ असं ट्विट त्यांनी केले होते. दरम्यान, आज (सोमवारी) संजय राऊत हे राज्यपालांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे फडणवीस हे दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. या बैठकीमध्ये राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कसा सोडवता येईल, यासंदर्भात ते चर्चा करणार  सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post