वाजपेयींची कविता ट्विट करत संजय राऊतांचा भाजपावर निशाणा


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची एक कविता ट्विट करत भाजपावर थेट निशाणा साधला आहे. 'आग्नेय परीक्षा की इस घड़ी में.. आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें.. ‘‘न दैन्यं न पलायनम्।' असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.
आव्हानांपासून पळ न काढता, त्यांच्याशी दोन हात करणं गरजेचं आहे असा संदेश गीतेतून देण्यात आल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ उद्या संपत असून,अद्यापही शिवसेना-भाजपातील तिढा कायम असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post