उद्धव ठाकरेंनी नेतृत्व स्विकारणं अभिनंदनाची गोष्ट : अमोल कोल्हे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिकिया दिली असून निर्णयाचं कौतुक केलं आहे.
ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पवारांच्या मार्गदर्शनासाठी जी आघाडी स्थापन झाली आहे ते महाराष्ट्रासाठी हिताची आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे जो शेतकरी, तरुणांचं प्रश्न सोडवेल. महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्विकारणं अभिनंदनाची गोष्ट आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. हा निर्णय देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे, याबाबत माझ्या मनात शंका नाही, असा विश्वासही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post