लता मंगेशकर रुग्णालयात दाखल


एएमसी मिरर : वेब न्यूज
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी श्वसनास त्रास झाल्यानंतर लता मंगेशकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं जात आहे.
एबीपी माझाला लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहेत. सोमवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लता मंगेशकर यांची बहिण आणि गायिका उषा मंगेशकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काळजीचं काहीही कारण नाही. लता मंगेशकर यांना व्हायरल इनफेक्शन झालं आहे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. चिंता करण्याची गरज नाही असं उषा मंगेशकर यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांनी लता मंगेशकर यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. विश्वास ठेवा सगळं काही स्थिर आहे. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर नसती तर मी इतक्या आरामात तुमच्याशी बोलले नसते, असेही त्या म्हणाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post