सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या फोटोचा फ्लेक्स झळकला


एएमसी मिरर : वेब न्यूज 
राज्यात शिवसेना-भाजपाच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला फ्लेक्स शहरात झळकला आहे. त्यामुळे राज्यभर चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असताना पुण्यातील कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याकडून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटे असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यावरील महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे…! बळीराजाच्या मनातील अन हातातील घड्याळाच्या अचूक वेळेने, धनुष्यबाणातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा…! अशा आशयाचा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येऊन नव्या सत्तेचा पॅटर्न उदयास आणणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post