कुटुंबात आणि पक्षात फूट : सुप्रिया सुळे
एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवलं आहे. पवार कुटुंबात फुट पडल्याचं त्यांनी याद्वारे म्हटलं आहे.
पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, असं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲपवर ठेवलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी जे काही केलं त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार म्हणाले होते. आपणही यापासून अनभिज्ञ असल्याचं म्हटलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post