कर्तारपूर गुरुद्वारा असलेल्या भागात दहशतवादी तळ?


एएमसी मिरर : वेब न्यूज
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याच जिल्ह्यामध्ये कर्तारपूर साहिब गुरुद्वारा आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटनला काही दिवस उरलेले असताना गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाली आहे. कर्तारपूर मार्गिका ही भारतातील पंजाबमध्ये असलेले डेरा बाबा नानक हे धार्मिक ठिकाण व पाकिस्तानातील कर्तारपूरचे दरबार साहिब यांना जोडणार आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून चार किमी दूर आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल, मुरीदके आणि शाकारगर येथील दहशतवादी तळांवर पुरुष आणि महिलांचे प्रशिक्षण सुरु आहे. पंजाब सीमेसंदर्भातील सुरक्षा यंत्रणांच्या उच्चस्तरीय बैठकीतून ही माहिती समोर आली आहे. कर्तारपूर कॉरिडॉर सुरु झाल्यानंतर पाकिस्तानातील विविध गटांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी या कॉरिडॉरचा वापर करु न देणे हे सुरक्षा यंत्रणांसमोर मुख्य आव्हान आहे. कर्तारपूर कॉरिडॉर सुरु करण्यासाठी पाकिस्तानने जी तत्परता दाखवलीय त्यामागे खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन देण्याचाही त्यांचा हेतू असू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post