ठाकरे सरकारची आज शक्तिपरीक्षा


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारची आज, शनिवारी विधानसभेत शक्तिपरीक्षा होणार आहे. विधानसभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरु होत असून यावेळी ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. यात महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर पक्ष आणि अपक्षांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्र विकास आघाडीत सध्या एकूण १७३ आमदारांचा समावेश आहे.

विधिमंडळ अपडेट्स...
- विश्वासदर्शक ठराव पारदर्शक पद्धतीने होईल- जयंत पाटील
-आजचा विश्वासदर्शक ठराव मंजूर होईल- जयंत पाटील
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, नाना पटोले यांना उमेदवारी
- उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच; बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्पष्ट

-खासदार चिखलीकर सहज भेटायला आले होते. ही भेट राजकीय नव्हती. वेगळा अर्थ काढू नका- अजित पवार
- वेगवेगळ्या पक्षात असलो तरी दुश्मन नाही- अजित पवार

-विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग, नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर अजित पवार यांच्या भेटीला

Post a Comment

Previous Post Next Post