मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? शिवसेना उद्या निर्णय घेणार?


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेनेकडून उद्या ‘मातोश्री’ शिवसेनेच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील सत्तेबाबत मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री पद याबाबत शिवसेनेचा उद्या अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.
दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं होणार असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. यानंतर दुपारी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांची भेट घेतली व या भेटीनंतर राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असं स्पष्ट केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी शिवसेनेची बैठक ही सत्ता स्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याबाबत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post