एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपने महाराष्ट्राचा आणि राजभवनाचा काळाबाजार केल्याचा आरोप केला होता. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी वेळेवर देखील आक्षेप घेतला होता. त्यानंतर लगेचच भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत, शपथ ग्रहणाची वेळ ही पहाटेची होती. आणि पहाटेची ती वेळ राम प्रहराची असते. आम्ही रामाचे सेवक आहोत. तुम्ही प्रभू रामचंद्रांना विसरला आहात असे सांगत, आम्हाला संजय राऊत यांनी शिकवण्याच्या फंद्यात पडू नये असे प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात जो न्याय निवाडा येईल तो येईल, पण 30 तारखेपर्यंत आम्हाला विश्वासदर्शक ठराव जिंकायला वेळ दिला आहे. किमान 170 संख्याबळाच्या जोरावर आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. 30 तारखेला बहुमत सिद्ध करुन महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, असेही आशिष शेलार म्हणाले.
शेलार म्हणाले की, आम्ही सकाळी सहा वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत, सकाळची वेळ ही रामप्रहराची असते, पण जे रामाला विसरले ते रामप्रहराला काळोख म्हणत आहेत. ज्यांनी सत्तेसाठी अयोध्या दौरा रद्द केला त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला स्थायी सरकार देउ असेही म्हटले आहे. तसेच राज्यपालांनी आम्हाला 30 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. आम्ही किमान 170 किंवा त्यापेक्षा अधिक आमदारांचा विश्वासदर्शक ठराव जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Post a Comment