नोटबंदी हा दहशतवादी हल्लाच होता : राहुल गांधी


एएमसी मिरर : वेब न्यूज
नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला, अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढविला आहे.

मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे.

नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post