'सत्ता स्थापनेचा पेच मोहन भागवत सोडवू शकतात'


एएमसी मिरर : वेब न्यूज 
राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजपा व शिवसेनेतील तिढा सुटत नसल्याचे पाहता, आता यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मदत करावी, अशी मागणी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. तिवारी यांनी यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र देखील पाठवले आहे.

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना तडजोडीसाठी पाठवावे, असे पत्र पाठवले आहे. नितीन गडकरी हा तिढा अवघ्या दोन तासांत सोडवू शकतात, असे तिवारी यांनी म्हटले आहे.
पत्रात तिवारी यांनी म्हटले आहे की, राज्यातील जनतेनकडून भाजपा-शिवसेनला जनादेश देण्यात आला आहे. मात्र, भाजपाकडून युती धर्माचे पालन केले जात नाही व राज्यातील सत्ता स्थापनेसाठी उशीर केला जात आहे. हे पाहता संघाने यात हस्तक्षेप करावा व हा तिढा सोडवावा.

Post a Comment

Previous Post Next Post