अजित पवार दिशाभूल करताहेत; शरद पवारांचे प्रत्युत्तर


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील असं ट्विट अजित पवारांनी केलं. मात्र, या टि्वटनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते टि्वटरवर म्हटले की, भाजपासोबत जाण्याचा कोणताही प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस असे तिघे मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे.
त्याच टि्वटमध्ये त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, अजित पवार यांचे म्हणणे तद्दन खोटे आहे. ते दिशाभूल करत आहेत. संभ्रम निर्माण करत आहेत. जनतेमध्ये चुकीचा समज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Post a Comment

Previous Post Next Post