गर्विष्ठ भाजपचा शेवट सुरु : नवाब मलिक


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : भारतीय जनता पार्टी हा पक्ष गर्विष्ठ पक्ष बनला आहे. मात्र, आता या भाजपाच्या शेवटाला सुरुवात झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे. आज दिवसभरात झालेल्या राज्यातील राजकीय ड्राम्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
बहुमत नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मलिक यांनी टीका केली. तसेच महाविकास आघाडी दीर्घकाळ टिकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले असून स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील हे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचा जन्म हा जातीयवादी राजकारण करण्यासाठी झालेला नाही. तर महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी शिवसेना स्थापन झाली. उलट भाजपासोबत हातमिळवणी केल्याने शिवसेनेची फरपट झाली, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post