रात्रीचे खेळ आमच्याकडे नाही : उद्धव ठाकरे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : जनादेशाचा अनादर केल्याचा आमच्यावर आरोप होतो. पण शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते. आम्ही दिवसाढवळया राजकारण करतो, रात्रीस खेळ चाले आमच्याकडे नाही. मी पणा विरुद्ध ही लढाई आहे. पाठित वार करण्याचा प्रयत्न करु नका, असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने सर्जिकल स्ट्राइक केला, असा आरोपही त्यांनी केला.
शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. मी पणा विरुध्द ही लढाई सुरु झाली होती. पुढची प्रक्रिया कायदेशीर आणि घटनेनुसार व्हावी, एवढीच अपेक्षा असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post