काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जयपूरमधील हॉटेलमध्ये बैठक झाली. यामध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.
सोनिया गांधी या शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्याकरिता तयार नसल्या तरी काँग्रेस आमदारांचा दबाव वाढला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे. यात पुढील सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post