गडकरी आणि फडणवीस आमच्यासाठी सारखेच!


एएमसी मिरर : वेब न्यूज 
नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस दोघे आमच्यासाठी सारखेच आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी गडकरींचीही भेट घेतली. याबाबत राऊत यांना विचारण्यात आले असता गडकरी आणि फडणवीस आमच्यासाठी सारखेच, असे असं म्हणाले.
संजय राऊत यांनी म्हणण्यामागे नेमकं काय कारण असावं? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. नितीन गडकरी मुख्यमंत्री होऊ शकतात का? अशी नवीन चर्चा संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे सुरु झाली आहे. दोघांची भेट होणं आणि संजय राऊत यांनी असं वक्तव्य करणं, याचे विविध अर्थ काढले जात आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post