पोलिसांच्या सतर्कतेने निर्दोष वॉचमनला मिळाला न्याय


एएमसी मिरर : नगर
एमआयडीसीतील स्वीचगिअर कंपनीतून तांब्याची तार व इतर सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या चोरीबाबत कंपनीच्या मालकाने कंपनीतील वॉचमनवर संशय व्यक्त करुन त्याला नोकरीवरुन काढून टाकले होते. परंतु पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या चोरी प्रकरणी वॉचमनचा काही संबंध नसून इतर सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चोर सांडून संन्याशाला फाशी असा प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून चार जण फरार झाले आहेत.
एमआयडीसीतील स्वीचगिअर कंपनीतून 25 ऑक्टोबर रोजी रात्री वॉचमनला मारहाण करुन 4 लाख 14 हजार रुपये किंमतीचा तांब्याची तार व इतर माल चोरीस गेला होता. या चोरीबाबत कंपनीच्या मालकाने वॉचमन विष्णू चोरमले याच्यावर संशय व्यक्त करुन तशी फिर्याद एमआयडीसी पोलिसांकडे दिली होती. तसेच कंपनीत चोरी केली म्हणून वॉचमन विष्णू चोरमले याला नोकरीवरुन काढून टाकले होते.
परंतु या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पवन सुपनर यांनी या घटनेबाबत सखा्ेल चौकशी केली असता ही चोरी वॉचमन विष्णू चोरमले याने केली नसून इतर सराईत गुन्हेगारांनी केल्याचे स्पष्ट झाले.
कंपनीतील या चोरी प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही चोरी भीमा सोपान मिरगे (रा. सावेडी), कैलास राजेंद्र जाधव (रा. बोल्हेगाव), अजय सोपान गुळवे (रा. नालेगाव) व सागर मच्छिंद्र वाघमारे (रा. निंबळक) यांनी त्यांच्या 4 साथीदारांसह केल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा चोरीचा माल संतोष धोत्रे, पप्पू ऊर्फ गोरख संभाजी जाधव, बबलू ऊर्फ पीरमहंमद शेख, व सुंदर खंडागळे यांनी विकत घेतला आहे. त्यामुळे तेही पोलिसांच्या रडाववर आले आहेत. पोलिस आपल्या शोधात आहेत, असे समजल्याने हे चौघे जण फरार झाले असून पोलिस त्यांचा तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post