पूनम महाजन यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिल्या शुभेच्छा


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा संभाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्याचवेळी महाविकास आघाडीबद्दल खोचक टिप्पणीही केली आहे.
“तीन चाकाची ही गाडी कुठवर चालते ते पाहू. फक्त शरद पवार ही अनैसर्गिक आघाडी एकत्र ठेऊ शकतात. काँग्रेसकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही. ते फक्त दिल्लीमधून हे सर्व पाहत आहेत” असे पूनम महाजन यांनी म्हटले आहे. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे ठाकरे कुटुंबाबरोबर घरोब्याचे संबंध होते.

Post a Comment

Previous Post Next Post