नगरमधील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे अपहरण


एएमसी मिरर : नगर
नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज (सोमवारी) सकाळी राहत्या घराजवळून अपहरण झाले. चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एका गाडीत बसवून पळविल्याचे सांगितले जात आहे. अपहरणाचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून हुंडेकरी यांचा शोध सुरू आहे.
करीमभाई हुंडेकरी हे सकाळी घराबाहेर पडलेले असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना पकडले. त्यानंतर एका गाडीत घालून पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांकडून हुंडेकरी यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post