नवीन सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जास्त मदत देऊ : अशोक चव्हाण


एएमसी मिरर : वेब न्यूज
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मदत तुटपुंजी असली तरी प्रशासनाने तातडीने ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासन अशोक चव्हाण यांनी दिले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. खरीपासाठी प्रति हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी १८ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post