अजित पवारांच्या पाठिंब्याबाबत अमित शहा म्हणतात..


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : अजित पवारांवर पक्ष नेतृत्वाने विश्वासच का ठेवला? असा सवाल आता भाजपामधूनच विचारला जात आहे. या सवालाला भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.
अमित शाह यांनी म्हटले की, विधीमंडळ नेता असल्याने भाजपाने अजित पवारांवर विश्वास ठेवला होता. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडले गेले होते. सरकार बनवण्यासाठी ते अधिकृत नेते होते. राज्यपालांनी देखील भाजपाचे सरकार बनवण्याबाबत अजित पवारांशीच चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा पहिल्यांदा सरकार बनवण्यास असमर्थता दाखवली होती, तेव्हा देखील त्या पत्रावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. त्यानंतर आमच्याजवळ जे आमदारांच्या पाठींब्याचे पत्र आले होते त्यावर देखील अजित पवारांची स्वाक्षरी होती.एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post