आजी-माजी राज्यपाल परेशान, भगतसिंग कोश्यारी यांचं विधान


एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्रातील लोकांनी असा निर्णय दिला आहे, की ज्या निर्णयामुळं माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे आणि वर्तमानातील राज्यपाल म्हणजे मी, आम्ही दोघेही परेशान आहोत. आज मला जरा गडबड आहे, त्यामुळे मी तुमचा लवकर निरोप घेतो, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.
'ये है मुंबई मेरी जान' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कुलवंतसिह कोहली यांच्या अनुभवावर आधारित 'ये है मुंबई मेरी जान' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हॉटेल 'ताज' येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सरदार कुलवंतसिंह कोहली यांनी अनेकांना आपल्या आयुष्यात उभं केलं आहे. हॉटेल, चित्रपट आणि उदयोग जगतापासून सामाजिक क्षेत्रापर्यंतच्या आठवणी आणि अनुभवांनी हे पुस्तक भरलेले आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे अनुभव या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आले, याचा मला आनंद आहे. मात्र, मी आज थोडा गडबडीत आहे. कारण महाराष्ट्रातील लोकांनी असा निर्णय दिला आहे की, ज्या निर्णयामुळं माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे आणि वर्तमानातील राज्यपाल म्हणजे मी, आम्ही दोघेही परेशान आहोत. त्यामुळे मला या कार्यक्रमातून लवकर जावं लागतंय, असं म्हणताचं कार्यक्रमात हशा पिकला.

Post a Comment

Previous Post Next Post