एएमसी मिरर वेब टीम
दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमधील ५१ वर्षाच्या शिक्षकाने सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच या शिक्षकाने दुष्कृत्य केल्याची माहिती पोलिस समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चंद्रमन खवस या व्यक्तीला अटक केली आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पोस्कोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चंद्रमनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Post a Comment