हैदराबाद एन्काउंटर : उदयनराजेंनी केले पोलिसांचे अभिनंदन


एएमसी मिरर वेब टीम 
सातारा : हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या वृत्ताची सोशल मिडियावर चर्चा सुरू असतानाच साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजेंनी तेलंगण पोलिसांचे अभिनंदन केलं आहे. “हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन!,” असं उदयनराजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.Post a Comment

Previous Post Next Post