पुणे : स्केटिंग प्रशिक्षकाची धारदार शस्त्राने हत्या


एएमसी मिरर वेब टीम 
पुणे : पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी परिसरात स्केटिंग प्रशिक्षकाची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश नाईक असे हत्या झालेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या मृतदेहाशेजारी बिअरच्या बाटल्या सापडल्या आहेत अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मारुंजी परिसरातील मैदानात निलेश यांचा मृतदेह आढळला. शेजारीच कोलते पाटील ही सोसायटी आहे, तेथील सुरक्षा रक्षकाने हा मृतदेह पाहिल्यानंतर घटना उघडकीस आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, निलेश यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार असल्याचे समोर आलं आहे. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी तीन बिअर बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मृतदेह मैदानात आणून टाकला की सोबत असलेल्यांसोबत वाद होऊन संबंधित घटना घडली आहे, याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. निलेश हे स्केटिंग प्रशिक्षक होते, अशी माहिती मिळत आहे. हिंजवडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post