आरे प्रकरणातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या : आव्हाड


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मुंबईतील आरे मेट्रो कारशेड प्रकरणी हायकोर्टाचा निकाल पर्यावरणवाद्यांच्या विरोधात जाताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन झाडे कापण्याचा प्रकार समोर आला होता. पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेच्या आंदोलकांना याची माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी धाव घेत आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना अटक केली होती. मेट्रो कारशेड होऊ नये यासाठी लढणाऱ्या २९ विद्यार्थी, महिला आणि नागरिकांवर गुन्हे दाखल केले होते. यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली.
महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलेल्या शब्दाला जागत आरेमधील मेट्रो कारशेड स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post