अहमदनगर : केडगावकरांसाठी शुक्रवारपासून शहर बससेवा


एएमसी मिरर वेब टीम

अहमदनगर : वर्षभरापासून बंद असलेली नगरची शहर बससेवा दीपाली ट्रान्सपोर्टने 6 जुलैपासून सुरु केली आहे. या बससेवेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून शुक्रवारपासून (दि.6) केडगाव, शाहूनगर येथून बसस्थानक ते निर्मलनगर अशी बससेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दीपाली ट्रान्सपोर्टचे संचालक प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.
दीपाली ट्रान्सपोर्टमार्फत महापालिकेच्या माध्यमातून जुलैपासून नगर शहरात बससेवा दिली जात आहे. आजपर्यंत शहर बससेवा निर्विघ्न सुरु असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला 11 बसेसच्या माध्यमातून बसस्थानक ते निंबळक, बसस्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज व बसस्थानक ते निर्मलनगर पर्यंत बससेवा सुरु करण्यात आली. आता पुन्हा नव्याने तीन बसेस नगरकरांच्या सेवेसाठी दाखल झाल्या आहेत.
या तीन नवीन बसच्या माध्यमातून केडगावकरांसाठी शाहूनगर-माळीवाडा बसस्थानक-निर्मलनगर अशी बससेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच तीच बस निर्मलनगर-माळीवाडा बसस्थानक-शाहूनगर अशी सुरु राहणार आहे. या बससेवेमुळे केडगाककरांची मागणी पूर्ण होणार आहे. दरम्यान, नगरसेवक मनोज कोतकर, सुनीता कोतकर यांनी केडगावसाठी सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post