अहमदनगर : रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍याचा उपोषणाचा इशारा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : संपूर्ण अहमदनगर शहरासह उपनगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. अनेक कामे मंजूर असूनही सुरू झालेली नाहीत. मनपा अधिकारी व पदाधिकारी या दुर्लक्ष करत आहेत. येत्या महिनाभरात ही कामे सुरू न झाल्यास अहमदनगर मनपासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा शिवसेना उपनगर प्रमुख काका शेळके यांनी दिला आहे.
या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदनही दिले आहे. पत्रकार चौक ते नागापूर या महामार्गासह भिस्तबाग ते टीव्हीसेंटर, मकासरे हेल्थ क्लब ते सिव्हिल हडको, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच सावेडी प्रभाग कार्यालयाच्या आवारात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे कर भरण्यासाठी व इतर कामांसाठी येणार्‍या नागरिकांनाही अडथळे निर्माण होत आहेत. यातील अनेक रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र, ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहेत. काही रस्त्यांची कामे नव्याने मंजूर करावी लागणार आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात कामे सुुरु न झाल्यास मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शेळके यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post