अहमदनगर : ‘कोचिंग क्लास’च्या इमारतीवर मनपाची कारवाई


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : येथील टिळक रोडवरील एका कोचिंग क्लासच्या इमारतीमधील पाच खोल्यांना महापालिकेने टाळे ठोकले आहे. 15.37 लाख रुपयांच्या थकबाकी पोटी बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने मंगळवारी (दि.10) ही कारवाई केली.
मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी मनपाकडून जप्ती कारवाई केली जात आहे. मागील आठवडाभरात पाच ते सहा मालमत्ता मनपाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवारी टिळकरोड वरील बच्चुभाई पुजारा यांच्या नावे असलेल्या ज्ञानसागर कोचिंग क्लासच्या मालमत्तेला टाळे ठोकण्यात आले आहे. या इमारतीमधील पाच खोल्या मनपाने सील केल्या आहेत. प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, कर निरीक्षक एस. एस. पुंड, व्ही. जी. जोशी, राजेंद्र म्हस्के, विजय चौरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post