अहमदनगर : बाजार समितीमधील गाळा सील; मनपाची कारवाई


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आणखी एका गाळ्याला अहमदनगर महानगरपालिकेच्या पथकाने टाळे ठोकले आहे. सुमारे चार लाख रुपयांच्या थकबाकीपोटी बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने बुधवारी (दि.१८) सकाळी ही कारवाई केली.
बाजार समितीमधील शिवाजी काशीद यांच्याकडे ४ लाख १२ हजार ११५ रुपयांची मालमत्ता कर व इतर कराची थकबाकी होती. वारंवार मागणी करूनही कर न भरल्याने मनपाने त्यांचा गाळा सील केला असल्याचे प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post