अहमदनगर : महापालिकेकडून 26 हजारांचा दंड वसूल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
शहरात प्लॅस्टिक वापरणार्‍यांविरोधात मनपाकडून आक्रमक कारवाई सुरू आहे. मागील काही दिवसांत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.10) शहरात करण्यात आलेल्या कारवाईत 26 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मंगलगेट, मंगळवार बाजार, वंजारगल्ली, केडगाव आदी परिसरांमध्ये मनपाकडून काल तपासणी करण्यात आली. स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, परीक्षित बीडकर, तुकाराम भांगरे, सुरेश वाघ, राजेंद्र सामल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post