अहमदनगर : तोफखान्यात तरूणाच्या खुनाचा प्रयत्नएएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : मोटारसायकलची चावी परत मागितल्याचा राग आल्याने शिवीगाळ, दमदाटी करून चाकुने वार करून 19 वर्षीय तरूणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना तोफखाना येथील शितळादेवी मंदिरासमोर मंगळवारी (दि.3) 11 वा. घडली.
दीपक देवानंद ताडला (वय 19, रा. दातरंगे मळा, नालेगाव, नगर) याच्या मोटारसायकलची चावी मोहित परदेशी (वय, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याने काढुन घेतली असता दीपक याने मोटारसायकलची चावी परत मागितली. याचा राग आल्याने मोहित याने शिवीगाळ करून दीपक यास मारहाण केली. तसेच त्याच्याकडील धारदार चाकुने दीपक याच्या हातावर, पोटावर वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या मारहाणीत दीपक गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी दीपक ताडला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307, 323, 504, 506 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत.
 


 

Post a Comment

Previous Post Next Post