अहमदनगर : झेडपी अध्यक्षपदी राजश्री घुले; प्रताप शेळके उपाध्यक्ष


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रताप पाटील शेळके यांची बिनविरोध निवड झाली. भाजपाने माघार घेतल्याने या निवडी बिनविरोध झाल्या.
महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले, उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाला. भाजपाने अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी भरलेले अर्ज माघारी घेतल्याने निवडी बिनविरोध झाल्या. 

Post a Comment

Previous Post Next Post